pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आदर्श नागरिक घडविण्यासाठी मुलांमध्ये मूल्य रुजवणे गरजेचे – डॉ. प्रमोद कुमावत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4

“घनसावंगी येथे मूल्यवर्धन तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न”

गट साधन केंद्र घनसावंगी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जालना व मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे मूल्यवर्धन तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले.
सदर प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलतांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रमोद कुमावत बोलताना म्हणाले की, भारताला जगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि जगापुढे आदर्श ठेवण्यासाठी येथील विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. विज्ञानाच्या मदतीने प्रगती करून मानवाचा वावर चंद्रापर्यंत पोहोचला आहे. मात्र अलीकडच्या काळात मूल्य पायदळी तुडवतांना समाजात दिसत आहे. याची रोज आपल्या आजूबाजूला पण उदाहरणे बघतो. मात्र नितीमान आणि मूल्यवान मूल घडवण्याची शिक्षकावर खूप मोठी भिस्त आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नायकाच्या भूमिकेमध्ये असतात. आपल्या वर्ग अध्यापनातून आणि कृतीतून आपण विद्यार्थ्यांपुढे नैतिक आदर्श ठेवण्याचा सतत प्रयत्न करूया.
घनसावंगी तालुक्यामध्ये तालुक्यातील वर्ग 1 ली ते 8 वीला वर्ग अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न झाले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून श्री प्रल्हाद सोलटे, श्री राहुल खेमाडे,श्री गौतम चौधरी विषय साधनव्यक्ती, श्री प्रमोद डोंगरदिवे, श्री रवींद्र ढाकणे, श्री सखाराम गुंगाणे, श्री अमर पत्की, श्री सतीश बोराळकर यांनी सुलभक म्हणून जबाबदारी पार पाडली.
हे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार व श्री अंकुश राखुंडे विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत, श्री सुनील खोडदे यांनी प्रशिक्षण प्रमुख म्हणून तर श्री प्रमोद येडले केंद्रप्रमुख, श्री शिवाजी राऊत केंद्रप्रमुख, श्री पिराजी पवार केंद्रप्रमुख यांच्या नियोजनात पार पडले.
सदर प्रशिक्षणाचे तालुका समन्वयक म्हणून गट साधनकेंद्र घनसावंगी यांच्याकडून श्री दादाभाऊ जगदाळे विषय साधनव्यक्ती यांनी, तर मुथा फाउंडेशन तर्फे श्री विकास तांगडे यांनी भूमिका पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे