“छंदाकडून व्यवसाय कडे” एस .बी. जालना शाळेत कार्यशाळा संपन्न!

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार कौशल्यावर आधारित शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमता ओळखून त्याचा विकास करणे गरजेचे आहे. असे कौशल्यावर आधारित अनेक उपक्रम प्रशालेमध्ये आयोजित केले जातात. असाच एक अनोखा उपक्रम जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती बिना पाठक यांच्या संकल्पनेतून आज दि. ६/१२/२०२५ रोजी प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आला होता. ‘बॅडमिंटनचे रॅकेट’ विणण्याची कार्यशाळा प्रशालेत घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी आदर्श विद्यालय, सायगाव (डों.) येथील श्री. राजेभाऊ मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मुख्याध्यापक श्री .एम. एस बिरहारे , उपमुख्याध्यापक श्री.युवराज पाडळे आणि ज्येष्ठ शिक्षक श्री.देशमुख इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी श्री. राजेभाऊ मगर यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटनची रॅकेट विणण्याचे कौशल्य शिकवले. तसेच हे कौशल्य शिकतांना काय काय काळजी घ्यावी आणि या बॅडमिंटन विणूणं स्व कष्टाने कमावलेल्या पैशातून शैक्षणिक खर्च भागवा असा सल्ला श्री.मगर यांनी दिला . तर प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला असून आम्ही नक्कीच याचे व्यवसायामध्ये रूपांतर करू अशी ग्वाही दिली.
————————————
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये उद्योजकता विकासासंदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षणही घेतले जात आहेत. सरस्वती भुवन प्रशालेमध्ये बॅडमिंटन विणणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ही चांगली बाब आहे. घरात अनेक बॅट खराब झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून विद्यार्थी वापरतील. यामध्ये विद्यार्थ्यांचा कारक विकास होईल तसेच मुले स्वत: तयार केलेल्या बॅटने खेळतील त्यामुळे त्यांचा शारिरीक विकासालाही चालना मिळेल. या स्तुत्य उपक्रमासाठी मार्गदर्शक श्री. राजेभाऊ मगर व सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मधुकर बिरहारे व श्रीमती बीना पाठक जोशी यांचे अभिनंदन.
डॉ. प्रमोद कुमावत
वरिष्ठ अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना.
————————————
डोक्या बरोबर हात सुद्धा सशक्त व्हावेत हे शिक्षणला अपेक्षित आहे हा संदेश देण्यासाठी श्री. राजेभाऊ मगर यांनी एक सुंदर उपक्रम सरस्वती भुवन प्रशालेत घेतला. बॅट विणणे याचे प्रशिक्षण दिले उपक्रम लहान होता परंतु त्या मागील भावना मोठी होती. बीनाची कल्पना बिना कामाची कशी असेल? यासाठी आयोजकाचे अभिनंदन!
प्रा. एम जी जोशी


