महानगरपालिका मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल
जालना/प्रतिनिधी,दि.14
महानगरपालिका निवडणूकाच्या अनुषंगाने जालना महानगर पालिकेची प्रभागनिहाय वार्डाची मतमोजणी दि. 16 जानेवारी 2026 रोजी मे. सरस्वती ऑटो कम्पोनंटस प्रा. लि. प्लॉट नं. बी-8/1 जालना फेस – 3 एम. आय.डी. सी. इंडंस्टीयल एरीया जालना येथे पार पडणार आहे. ही मतमोजणी सकाळी 7.00 वाजल्यापासुन फेरीनिहाय मतमोजणी संपेपर्यंत चालणार असून निकाल ऐकण्यासाठी जनतेची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये रस्ता मोकळा रहाव व रस्त्यावर वाहने उभी राहून मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने वाहतुकीच्या नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. असा आदेश पोलील अधीक्षक अजय बंसल यांनी पारीत केला आहे.
दि. 16 जानेवारी 2026 रोजी जालना महानगरी पालिकाची मतमोजणीचे अनुषंगाने वाहतुक नियमनाबाबत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.
नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्गावरील जालना समृध्दी टोल नाका येथून बाहेर पडणारी आणि जालना तसेच छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही मतमोजणी ठिकाणाच्या पुर्व बाजूकडील महादेव मंदीर – खांदगांव रोड- विनोद रॉय इंजिनियरिंग प्रा. लि. कंपनी- शिवनेरी हॉटेल (ढाबा) – मार्गे जालना व छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.
छत्रपती संभाजीनगरकडून बदनापूर मार्गे येणारी व समृध्दी महामार्गाकडे जाणारी वाहतुक ही शिवनेरी हॉटेल (ढाबा)- विनोद रॉय इंजिनियरिंग प्रा. लि. कंपनी – खांदगांव रोड – महादेव मंदीर मार्गे समृध्दी महामार्गाकडे जाईल.
जालनाकडून येणारी व समृध्दी महामार्गाकडे जाणारी वाहतुक ही शिवनेरी हॉटेल (ढाबा) – विनोद रॉय इंजियिरिंग प्रा. लि. कंपनी – खांदगांव रोड – महादेव मार्गे समृध्दी महामार्गाकडे जाईल.
वरील आदेश दि. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5.00 वाजेपासुन मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.


