उरण महाविद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण – रायगड येथे क्रिडा सप्ताह मोठया उत्साहात संपन्न झाले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर व्ही. व्ही. गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०८/०१/ २०२६ ते १३/१/ २०२६ या कालावधीत कोटगाव ग्राम सुधारणा खेळाचे मैदान या ठिकाणी क्रीडा सप्ताह संपन्न झाला. क्रीडा सप्ताहासाठी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा.इंदुलकर व प्रा.आर. टी. ठवरे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून कोटगाव ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष जयेश भोईर हे उपस्थित होते. सदर क्रीडा सप्ताह मध्ये क्रिकेट, खो- खो, कबड्डी, फुटबॉल या सांघिक खेळासह धावणे, उंच उडी ,लांब उडी ,थाळीफेक, भालाफेक, गोळा फेक, चेस, कॅरम बॅडमिंटन इत्यादी वैयक्तिक स्पर्धाही घेण्यात आल्या. विजेत्या खेळाडूंना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर क्रीडा सप्ताहात बहुसंख्येने सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ. आनंद गायकवाड यांनी केले व पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय डॉ. ए. आर. चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका विनिता तांडेल यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ. एमजी लोणे यांनी केले.


