ब्रेकिंग

महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात.

"महाविकास आघाडीच्या सरकारला कटकारस्थान रचून पाडण्याचे काम करण्यात आले"

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अमरावती/प्रतिनिधी, दि.27

तिवसा खेळाडू असल्याने मी एक गोष्ट शिकले. ज्या व्यक्तीची नाळ सामान्य माणसाशी जुळली असते, जो तुमच्या सुखातच नाही दु:खातही सहभागी होतो. तोच या देशाचे भवितव्य घडवू शकतो. महाविकास आघाडीच्या सरकारला कटकारस्थान रचून पाडण्याचे काम करण्यात आले. या सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे, अशी टीका कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांनी केली. मविआच्या उमेदवार आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा येथील सभेत त्या बोलत होत्या.

महायुतीचे कारस्थान

फोगाट म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पेटून उठणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींना पराभूत करण्यासाठी महायुती सरकार कटकारस्थान रचत आहे. मात्र, विकासासाठी सतत झटणाऱ्यांना कुणीही रोखू शकत नाही. एकीकडे दोन मोठे राजकीय पक्ष संविधान तोडण्याचे काम करीत आहेत, तर दुसरीकडे आम्ही संविधान वाचविण्यासाठीचा लढा उभारला आहे, असे म्हणत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे