पिठ्ठी येथे जय हनुमान गणेश मित्र मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
पाटोदा: नितिन भोंडवे,दि.17
गणेश उत्सव जवळ आला की युवकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण होत या काळामध्ये गणेश मंडळ विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करताना आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे जय हनुमान गणेश मित्र मंडळ भोंडवे वस्ती येथे गेले दहा दिवसात विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, खो-खो, कबड्डी,अश्या अनेक खेळांचा समावेश करून यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला आज बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य मा. बाळासाहेब खोमणे, मा.महेश भोंडवे, व. गोपीनाथ भोंडवे, युवा पत्रकार नितिन भोंडवे,भीमराव भोंडवे,विनोद भोंडवे (पाटील) आकाश सोनसळे,आकाश भोंडवे,पूनाजी वादगे,भागवत काळे,नितिन भोंडवे,ओमकार भोंडवे, धनंजय भोंडवे,शंतनु भोंडवे,ओमकार काळे ,आदी. मान्यवर उपस्थित असून गणेश मित्र मंडळाची कमिटी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले…