ब्रेकिंग

मौजे गुरुपिंपरी ता.घनसावंगी येथील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे दुष्काळी अनुदान तात्काळ मंजूर करा – सतीश मन्नूभाऊ कोल्हे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.26

मौजे गुरुपिंपरी ता.घनसावंगी जि.जालना येथील ६१ शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे दुष्काळी अनुदान तात्काळ मंजूर करा अन्यथा २ ऑक्टोबर २०२४ रोजी उपोषणाला बसणार असे निवेदन श्री.सतीश कोल्हे आणि ६१ शेतकऱ्यांनी मा.जिल्हाधिकारी, जालना यांना दिले आहे.

निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, मौजे गुरुपिंपरी ता.घनसावंगी येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना मागील वर्षीचे दुष्काळी अनुदान मिळाले आहे, परंतु ६१ शेतकऱ्यांना अद्यापही दुष्काळी अनुदान मिळाले नाही. दुष्काळी अनुदान मिळणेसाठी गावचे ग्रामविकास अधिकारी श्री.रूपणार, तलाठी श्रीमती खर्जुले व घनसावंगी च्या तहसीलदार मॅडम यांना वारंवार भेटून दुष्काळी अनुदान मिळणेसाठी विनंती केली आहे. परंतु दुष्काळी अनुदान लवकरच मिळेल असेच उत्तर सर्व अधिकाऱ्यांकडून मिळते, पण अद्यापही दुष्काळी अनुदान मिळाले नसल्याने सदरील ६१ शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे दि.२३/०९/२०२४ रोजी सर्व शेतकऱ्यांनी मा.जिल्हाधिकारी, जालना यांना लेखी निवेदन देऊन दुष्काळी अनुदान तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली व दि. २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अनुदान मंजूर केले नाहीतर दि. २ ऑक्टोबर २०२४  रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर उपोषणास बसण्याचा इशारा ही दिला.

निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी, जालना यांनी मा.निवासी उप जिल्हाधिकारी, जालना व मा. तहसीलदार, घनसावंगी यांना तपासून तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

गोवर्धन कोल्हे

स्वीय सहाय्यक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे