ब्रेकिंग

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या वतीने सिडको कार्यालयासमोर आंदोलन.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने गेली ४ ते ५ वर्षे सातत्याने आवाज उठविला आहे.विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कमिटीने अनेक संप,आंदोलने केली.अनेक बैठका घेतल्या , प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु सिडको महामंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ पासून सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथील सिडको कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी आंदोलनाचे तिसरा दिवस आहे.अद्यापही मात्र प्रशासनाने आंदोलनाची कोणतेही दखल घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये, कमिटीचे पदाधिकारी सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष विशाल भोईर,अखिल भारतीय किसान सभा रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,सचिव संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगुणा डाकी, किरण केणी, प्रवीण मुत्तेमवार यशवंत भोपी आदी विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त आंदोलनाला बसले आहेत.

———————————————————–

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांवर गेली ४ ते ५ वर्षे सातत्याने आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमांतून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. अनेक बैठका झाल्या परंतू सिडको महामंडळाने आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. दि. ०१/०७/२०२४ रोजीच्या मंत्रालयावर मोर्चाच्या अनुषंगाने दि. २३/०७/२०२४ रोजी मा. शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीस सिडकोचे प्रतिनिधी तसेच नगरविकास खात्याचे प्रतिनिधी हजर होते. असे असताना आजतागायत त्या संदर्भात काहीही निर्णय झालेला नाही.
– संजय ठाकूर,सचिव – अखिल भारतीय किसान सभा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या खालीलप्रमाणे :

मागण्या :

१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मा दि.बा. पाटील साहेब यांचे नाव द्या.

२) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेले मच्छिमारांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे परंपरागत व्यवसायाचे साधन नष्ट होत असल्या कारणाने त्यांना पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई दया.

३) ज्या घरांचा सर्व्हे झालेला आहे व नंबर टाकलेले आहेत, अशी सर्व बांधकामे सिडकोने नाकारून त्यांना शुन्य पात्रता दिलेली आहे अशा बांधकामधारकांना सरसकट पुर्ण पॅकेज लागू करा.

४) विमानतळ बाधित १० गावातील बेरोजगार युवक व युवतींना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी त्यांना रोजगारक्षम प्रशिक्षण देणे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रकल्पग्रस्त म्हणून १८ वर्षांवरील प्रत्येक युवक/युवतीस विमानतळ बाधीत म्हणून दाखला देवून, येणाऱ्या कंपनीसोबत सिडकोने नोकऱ्यांसाठी करार करावा.

५) वाघीवली गावातील प्रकल्पग्रस्तांना तातडीने घरांचे भूखंडाचा ताबा दया.

६) वाघीवली गावातील ज्या लोकांनी घरे तोडलेली आहेत परंतू सिडकोने आजपर्यंत त्यांना घरासाठी भूखंड दिलेला नाही त्यांना आतापर्यंत तसेच पुढील प्लॉटचा ताबा देऊन ओ.सी. मिळेपर्यंत मार्केट रेटप्रमाणे घरभाडे भत्ता चालू ठेवावा.

७) ज्यांची घरे सिडकोने तोडली आहेत त्यांना बांधकाम खर्च रु. १५००/- प्रमाणे देण्यात यावा व ज्या घरांना १८ महिन्याच्या कालावधीसाठी घरभाडे दिले होते ते १८ महिने संपून ५ वर्षे पुर्ण झालेली आहेत. अशा घरांना अधिक घरभाडे वाढवून देण्यात यावे.

८) तलावपाली, चिंचपाडा येथील घर मालकांना फक्त एक पटच भूखंड दिलेला आहे तसेच आर्थिक सहाय्य पुर्ण दिलेले नाही त्यांना तिप्पट भुखंड व आर्थिक सहाय्य पुर्ण पॅकेज मिळाले पाहिजे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे