ब्रेकिंग

कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी प्रवासी बसच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन  

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 2

 जिल्ह्यात व जालना शहरात खाजगी कंत्राटी प्रवासी बसची तपासणी व मनमानी भाडे आकारणीबाबत दि.1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. मोटार वाहन कायदा व त्याखालील तरतुदींचा भंग करणाऱ्या खाजगी बस धारकांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. मनमानी भाडे आकारणाऱ्या कंत्राटी बस धारकांविरुध्द तक्रार करण्यासाठी जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हेल्पलाईन क्रमांक 02482 220480 तसेच ई-मेल dyrto.21-mh@gov.in कार्यान्वित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी खाजगी कंत्राटी बस धारकांकडून प्रवासासाठी जादा भाडे आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी,  असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे