ब्रेकिंग

राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात कै.भिमराव पाटील डोंगरे (आबा) यांच्या जयंतीनिमित्त प्रवचनाचा कार्यक्रम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी,दि.7

 

राजुरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्था संचलित – राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव ता.बदनापुर जि.जालना येथे आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी कै.भिमराव पाटील डोंगरे (आबा) यांच्या जयंतीनिमित्त प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री ह भ प संगमदास महाराज,श्री ह भ प बळीराम महाराज यादव रांजणीकर यांनी आपल्या प्रवचनातून आबांच्या जीवन कार्याविषयी सर्व माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व पालक तसेच विद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी आबांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा -2024 मधील प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांडुरंग तात्या डोंगरे यांच्या हस्ते आलेल्या सर्व पाहुण्यांना पुस्तक भेट करून शिक्षणामुळे अनेक पिढ्या घडतात व विद्यार्थ्यांचे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते म्हणून आपल्या भाषणातून तात्यांनी सर्व पालकांना आबांनी शाळा स्थापन केली पण ती चालवण्याची जबाबदारी आता या पंचक्रोशीतील जनतेवर आहेत व सर्वांनी आपली शाळा म्हणून शाळेला सहकार्य करून शाळा कायमस्वरूपी चालवावी असा मोलाचा संदेश दिला. शेवटी सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे