ब्रेकिंग

करंजा कोळी कोंढरीपाडा येथील असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

उरण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे, बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी उरण तालुक्यातील करंजा कोळी कोंढरीपाडा येथील असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच उपतालुका संघटक व चाणजे माजी सरपंच अमित भगत यांच्या प्रयत्नाने करंजा मच्छीमार सोसायटी चे विद्यमान सदस्य गौरेश कोळी, तसेच कोळी कोंडरी पाड्यातील त्याचे सहकारी रोहित कोळी, संतोष कोळी, केतन कोळी, ओमकार कोळी, सिद्धेश्वर कोळी, विक्रांत कोळी, क्रिश कोळी, मानव कोळी, अनिकेत कोळी, स्वयंम कोळी, व्यंकटेश कोळी, बंटी पाटील व त्यांचे सहकारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला या सर्वांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत स्वागत केले.पक्ष प्रवेश झाल्याने आजही मनोहर भोईर यांचा करिष्मा कायम असल्याचा सर्वांना पाहावयास मिळत आहे.

सदर वेळी उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उपतालुका संघटक अमित भगत, विभागप्रमुख राजू पाटील, शाखाप्रमुख अमृत कोळी, उपशाखाप्रमुख विघ्नेश नाखवा, गजानन लव्हले, नंदू चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते. मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश होत असल्याने शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढतच आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे