जालना विधानसभा भारतीय जनता पार्टी लढणार
भास्कर आबा दानवे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यासाठी जालना भाजापाचे प्रदेशाकडे ठराव घेऊन मागणी
जालना/प्रतिनिधी,दि.4
जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांना भारतीय जनता पार्टी ची उमेदवारी देण्यासाठी यांची बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली.
या बैठकीत जालना विधानसभा भारतीय जनता पार्टी ला सोडल्यास उमेदवार म्हणून भास्कर आबा दानवे यांचे नाव जाहीर केले तर जालना विधानसभा मतदार मतदारसंघातून भाजपचा विजय निश्चित असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी व्यक्त केले. जालना विधानसभेसाठी भास्कर आबा दानवे यांना उमेदवारी देण्याचा एक मुखी निर्णय भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठराव घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविला आहे.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजपा जालना महानगराध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, भागवत बावणे, कपिल दहेकर, बाबासाहेब कोलते, महानगर उपाध्यक्ष धनराज काबलीये, वसंत शिंदे, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, अर्जुन गेही, शिवराज जाधव, मनोज बिडकर, सुमित सुरडकर, बबनराव सिरसाठ, सखुबाई पणबिसरे, श्रीकांत शेलगावकर, पांडुरंग पोहेकर, कैलास उबाळे, संजय डोंगरे, बाबुराव भवर, अनिल सरकटे, दिपाली बिन्नीवाले, सिद्धेश्वर हसबे, प्रमोद गंडाळ, प्रभुलाल गोमतीवाले, सुदर्शन काळे, इम्रान सय्यद, डोंगरसिंग साबळे, सोमेश काबलिये, अभिजित अंभोरे, अमन मित्तल, रोहित नलावडे, सुधाकर खरात, रवि कायंदे, निवृत्ती लंके, नागेश अंभोरे, दत्ता जाधव, शारदा काळे, वंदना ढगे, सागर वाहूळकर, करण झाडीवाले यांच्यासह जि.प., पं.स. सदस्य, भाजपा प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठ्या उपस्थिती होती.